भाऊबीजेनिमित्त भावाने बहिणीला दिली अनोखी भेट

Foto


औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सणबहीणीस पुस्तकांची भेट देत आगळ्या वेगळ्या पध्दतीने   साजरा करण्यात आला. बहीणीने आपल्या भावास औक्षण करुन मिठाई भरविली प्रसंगी भावाने ओवाळणीच्या स्वरूपात पैसे, वस्तू न टाकता थोर महापुरुषांच्या विचारांचे  पुस्तक भेट देवून बौद्धिक मेजवानीने सण साजरा केला.


नाचनवेल येथील पत्रकार रवींद्र पिंपळे यांच्या निशांत या मुलाने बहीण कार्तिकी हिला स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ भेट दिले. कपडे, भेटवस्तू देण्याऐवजी जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या ग्रंथांची भेट देत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. निशांतचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणीला सामाजिक द्रष्टेपणाची देणगी देणाऱ्या महात्मा फुलेंचे पुस्तक देऊन सामाजिक परिवर्तनाची चाहूल लागल्याचे संकेत दिले.